सणासुदीच्या दिवसांत सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

सणासुदीच्या दिवसांत सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 120 रुपयांनी वाढले. चांदीच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 120 रुपयांनी वाढले. चांदीच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे.

रुपया कमजोर झाल्यामुळे आणि सणांच्या निमित्ताने सोन्याला जास्त मागणी असल्यामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सोन्याचे भाव 39 हजार 30 रुपये प्रतितोळा झाले आहेत. जागतिक स्तरावरचे सोन्याचे भाव पाहिले तर न्यूयॉर्कमध्ये 1 हजार 485 डॉलर प्रतिऔंस एवढा सोन्याचा दर आहे. चांदीचा दर 17.33 डॉलर प्रतिऔंस झाला आहे.

(हेही वाचा : Parle G : 2 महिन्यांपूर्वी 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात, आता 55 कोटींनी वाढला नफा)

चांदीच्या दरातही 489 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव 46 हजार 809 रुपये प्रतिकिलो झाला. मंगळवारी चांदीची किंमत 46 हजार 320 रुपये प्रतिकिलो होती.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

==================================================================================

VIDEO : मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 16, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या