सोनं झालं स्वस्त पण चांदीला आली चमक, काय आहेत आजचे दर?

सोनं झालं स्वस्त पण चांदीला आली चमक, काय आहेत आजचे दर?

दिवाळीसाठी सोनं खरेदी करणार असाल तर चांगली संधी आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झालीय. चांदीला मात्र दर वाढल्यामुळे नवी चमक आलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : दिवाळीसाठी सोनं खरेदी करणार असाल तर चांगली संधी आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झालीय. सोन्याच्या आजच्या दरात 105 रुपयांनी घट झाली. सोन्याचा दर 38 हजार 985 रुपये प्रतितोळा झाला. रुपया वधारल्यामुळे आणि जागतिक बाजारात बदललेल्या परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात घट झालीय.

HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, ब्रेक्झिट आणि अमेरिका - चीन यांच्यातल्या व्यापारविषयक करार याबदद्लच्या सकारात्मक वातावरणामुळे सोन्याचे दर खालावले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1 हजार 488 डॉलर प्रति औंस झाले. चांदीचा दर 17.45 डॉलर प्रति औंस एवढा आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे दर मात्र वाढले आहेत. चांदीच्या किंमतीत 509 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 46 हजार 809 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

(हेही वाचा : इथे राहणारे लोक खाऊ शकणार नाहीत Dominos पिझ्झा, कंपनीने घेतला मोठा निर्णय)

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या आधी ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

==========================================================================================

VIDEO : अयोध्या प्रकरणाचा असा निकाल यावा की, ओवेसी म्हणतात...

Published by: Arti Kulkarni
First published: October 17, 2019, 6:49 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या