दिवाळीच्या दिवसांत सोनं महागलं, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

दिवाळीच्या दिवसांत सोनं महागलं, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

दिवाळीच्या दिवसात सोन्याला चांगला भाव आलाय. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करायची असेल तर सोन्याचे वाढलेले भाव जाणून घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : दिवाळीच्या दिवसात सोन्याला चांगला भाव आलाय. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करायची असेल तर सोन्याचे वाढलेले भाव जाणून घ्या. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 75 रुपयांनी महाग झालंय तर चांदीचे भाव 110 रुपयांनी वाढलेत. सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीला चांगली मागणी असल्यामुळेच हे भाव वाढले आहेत,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सोन्याचे नवे दर

सोन्याचा दर 38 हजार 945 रुपयांवर गेला आहे तर चांदी 46 हजार 520 रुपये प्रतिकिलो झाली.जागतिक बाजारात सोन्याचे दर 1 हजार 490 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा भाव 17. 52 डॉलर प्रतिऔंस झाला.HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, रुपया कमजोर झाल्याने आणि सणासुदीच्या दिवसात मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत. असं असलं तरी जागतिक बाजारात मात्र सोनं आणि चांदीचे भाव घटले आहेत.

(पाहा PHOTO : महाराष्ट्राच्या महासंग्रामात कोण जिंकलं? कोण हरलं?)

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या आधी ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

==========================================================================================

मला इंग्रजी येत नाही, निकालाच्या तणावपूर्ण वातावरणात मुख्यमंत्र्यांना फुटले हसू, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 24, 2019 06:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading