या कारणांमुळे सोनं झालं एवढं महाग, हे आहेत आजचे दर

या कारणांमुळे सोनं झालं एवढं महाग, हे आहेत आजचे दर

सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी आलीय. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी आलीय. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झालीय.

सोन्याचे भाव 115 रुपयांनी वाढून 39 हजार 17 रुपये प्रतितोळा झाले. 24 कॅरट सोन्याचे भाव बुधवारी 38 हजार 902 रुपये होते.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1500 डॉलर आणि चांदीचे भाव 18 डॉलर प्रतिऔंस झालं.

चांदीला आली झळाळी

चांदीचा भाव 95 रुपयांनी वाढून 47 हजार 490 रुपये प्रतिकिलो झाला.  HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, मजबूत ग्लोबल ट्रेंडमुळे गुरुवारी सोन्याचा भाव वाढला. रुपया कमजोर पडल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतींमुळेही सोन्याला उभारी मिळाली.

(हेही वाचा: PMC बँक घोटाळ्यातला सहावा बळी, महिलेचा हृदयविकाराने मृत्यू)

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

ज्या किंमतीला तुम्ही सोन्याची खरेदी करता ती स्पॉट प्राइस असते. शहरातल्या सराफ संघटना मिळून बाजार सुरू होण्याआधी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव वेगळे असतात.

(हेही वाचा : उद्यापासून बदलणार बँकांचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम)

==========================================================================================

पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, सिंधुदुर्गातील स्थितीचा GROUND REPORT

First published: October 31, 2019, 7:06 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading