सोनं आणि चांदीला पुन्हा झळाळी, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीला पुन्हा झळाळी, हे आहेत आजचे दर

लग्नसराईच्या दिवसांत सोनं महाग झालं आहे. सोन्याला मागणी वाढल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : लग्नसराईच्या दिवसांत सोनं महाग झालं आहे. सोन्याला मागणी वाढल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याचे भाव 225 रुपयांनी वाढलेत. आता सोन्याचे दर 38 हजार 715 रुपये प्रतितोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 हजार 461 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 16. 90 डॉलर प्रतिऔंस झाली.

सोन्याचे भाव मंगळवारी 38हजार 490 रुपये प्रतितोळा होते. त्यात वाढ झाली. चांदीच्या किंमतीतही 440 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर 45 हजार 480 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

का वाढले सोन्याचे दर ?

HDFC सिक्युरिटीजचे सिनिअर अ‍ॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, लग्नसराईमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होतेय. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी आलीय. त्यामुळे 24 कॅरट सोन्याचे भाव वाढले. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानेही सोन्याचे दर वाढले आहेत.

अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारविषयक चर्चेत अनिश्चतता वाढली आहे. त्याचबरोबर हाँगकाँगमध्येही राजकीय उलथापालथ झालीय. डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली येऊन 71. 77 वर आलाय. ही सगळी सोन्याचे दर वाढण्याची कारणं आहेत.

(हेही वाचा : मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर आणखी एक मोठा धक्का)

तपन पटेल यांच्या मते, व्यापारविषयक चर्चेत डॉनल्ड ट्रम्प यांचं स्पष्ट धोरण नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांचा कल आहे.

पुढच्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

======================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 13, 2019, 5:25 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading