खूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर

खूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर

धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये 30 रुपये प्रतितोळा घट झाली. चांदीच्या किंमतींमध्ये मात्र तेजी आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये 30 रुपये प्रतितोळा घट झाली. चांदीच्या किंमतींमध्ये मात्र तेजी आली आहे. सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 38 हजार 955 रुपयांवर गेले. चांदीचे दर 150 रुपयांनी वाढून 38 हजार 985 रुपयांवर गेले.

सणासुदीच्या दिवसात तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर ही खबरदारी घ्यायला हवी.

सोन्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पावडर मिसळली जाते. ही भेसळ सोन्याच्या अनेक चाचण्यांमध्येही लक्षात येत नाही. ही सिमेंटसारखी पावडर परदेशातून भारतात येते. याबद्दल ग्राहकांनी त्यांच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत.

सोन्यामध्ये जादा सवलत मिळवणं किंवा लकी ड्रॉ पासून सावध राहा. याआधी फक्त सोन्याच्या चेनमध्येच भेसळ होत होती पण आता ही भेसळ दागिन्यांमध्येही केली जातेय.

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

किंमतीबद्दल राहा सावधान

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

(हेही वाचा : PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये)

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

=============================================================================================================

EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

First published: October 22, 2019, 7:21 AM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading