सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये नवा बदल, हे आहेत आजचे दर

सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये नवा बदल, हे आहेत आजचे दर

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीय. दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 145 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर चांदीचे दरही 240 रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीय. दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 145 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर चांदीचे दरही 240 रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत.

सोन्याचे नवे दर

HDFC सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर आता प्रतितोळा 38 हजार 885 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1 हजार 490 डॉलर प्रतिऔंस झाले आहेत. त्याचवेळी चांदीचे दर 17. 57 डॉलर प्रतिऔंस झाले. रुपया कमजोर झाल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सणासुदीच्या दिवसांत सोन्याला मागणी वाढल्यामुळेही सोन्याच्या दरात तेजी आली, असं HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांनी सांगितलं.

विक्रमी दरवाढ

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली होती. गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

========================================================================================

EXCLUSIVE : शिवसेनेसाठी नारायण राणेंनी टाकलं एक पाऊल पुढे, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 14, 2019 05:53 PM IST

ताज्या बातम्या