नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी आलीय.
दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्यामध्ये 126 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे चांदीलाही चमक आलीय. चांदीचे दर 380 रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या दिवसांत सराफांची सोन्याला चांगली मागणी असल्यामुळेच सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. रुपया कमजोर झाल्यामुळेही सोन्याच्या दरांवर याचा परिणाम झाला.
1 रुपयात खरेदी करा सोनं
सोन्याचा दर 10 ग्रॅमला 39 हजार 160 रुपये झाले तर चांदीचा दर किलोला 46 हजार 900 रुपये झाला. या धनत्रयोदशीला तुम्ही फक्त 1 रुपयांत सोनं खरेदी करू शकता. Paytm गोल्डमधून सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला Paytm अॅपवर सोनं खरेदी करण्याचा पर्याय आहे. त्याचबरोबर याच अॅपवर तुम्ही सोन्याची विक्रीही करू शकता.
वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव
तुम्ही ज्या किंमतीत सोन्याची खरेदी करता ती स्पॉट प्राइस असते. बहुतांश शहरांमध्ये सराफ असोसिएशनचे सदस्य एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवतात. यामध्ये व्हॅट, लेव्ही हे सगळं धरून भाव ठरवले जातात. याशिवाय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत शुद्धतेच्या आधारे ठरते. 22 कॅरट आणि 24 कॅरट सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.
(हेही वाचा : पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता, आता हे नवं कारण)
============================================================================================
एक एकाला वेचून वेचून बाहेर काढू, अमित शहांचा इशारा, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा