सोनं आणि चांदीला नवी झळाळी, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीला नवी झळाळी, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमती आणि भारतीय रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी आलीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमती आणि भारतीय रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी आलीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले. सोन्याच्या दरात 296 रुपयांनी वाढ झालीय. त्याचवेळी चांदीच्याही किंमती वाढल्या आहेत. एक किलो चांदीचे दर 331 रुपयांनी वाढलेत.

सोन्याचे नवे दर

दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 39 हजार 194 रुपये प्रतितोळा झालेत. चांदीच्या दरातही वाढ होऊन हे दर 46 हजार 103 रुपये प्रतिकिलो झाले.

सोनं का झालं महाग ?

HDFC सिक्युरिटीच्या अहवालानुसार, अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने रुपया कमकुवत झाला आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या दरांवर झालाय. येत्या काही दिवसात रुपया आणखी कमजोर झाला तर एक तोळा सोन्याचे दर 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

(हेही वाचा : 1 जानेवारीपासून बदलणार सोनं खरेदीचा नियम, सरकारने दिली मंजुरी)

सोनंखरेदीचे नियम बदलणार

1 जानेवारीपासून सोन्याची खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सोनं- चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सक्तीचं करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र मिळू शकेल. सध्या 40 टक्के दागिन्यांचं हॉलमार्किंग केलं जातं. हॉलमार्किंग केलेले दागिने हे पूर्णपणे शुद्ध सोन्याचे असतात.

सोन्याची आयात मोठी

भारत हा सोन्याची आयात करणारा मोठा देश आहे. भारतात दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आयात केलं जातं.सोन्याचं हॉलमार्किंग करण्यासाठी देशभरात 400 ते 500 नवी केंद्रं उघडण्यात येणार आहेत. सध्या देशात अशी 700 केंद्र आहेत. सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी ग्रामीण क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Nov 20, 2019 05:03 PM IST

ताज्या बातम्या