मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आज सोनं सगळ्यात महाग, यावर्षी होऊ शकतो एवढा दर

आज सोनं सगळ्यात महाग, यावर्षी होऊ शकतो एवढा दर

सोन्याच्या दरात बुधवारी जोरदार तेजी आली. अमेरिका आणि इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे आहे. यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 8 जानेवारी : सोन्याच्या दरात बुधवारी (Gold-Silver Prices Today) जोरदार तेजी आली. अमेरिका आणि इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे आहे. यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 485 रुपयांनी वाढले आहेत. सोन्याच्या किंमतींनी रेकॉर्ड रचलंय. त्याशिवाय चांदीचे भाव 855 रुपयांनी वाढलेत.

सोन्याच्या नव्या किंमती

सोन्याचे नवे दर एक तोळ्याला 41 हजार 810 रुपये झालेत.यावेळी सोन्याच्या किंमतीत 485 रुपयांची तेजी आलीय. यावर्षी सोन्याचे दर 43 ते 45 हजार रुपयांवर जाऊ शकतात, असं केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांनी म्हटलं आहे.

चांदीचे नवे दर

सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही वाढले आहेत. चांदीचे भाव 49 हजार 530 रुपये प्रतिकिलो झालेत.

(हेही वाचा : SBI Alert!मोबाइल नंबर आणि Email Id रजिस्टर केलात का? या 3 गोष्टींची मिळेल माहिती)

का वाढले सोन्या-चांदीचे दर?

HDFC सिक्‍युरिटीजचे तज्ज्ञ देवर्श वकील यांच्या मते, अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम भारतावरही झालाय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 611 डॉलर प्रतिऔंस झाले.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही ज्या किंमतीला सोनं खरेदी करता त्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. शहरांमधल्या सराफ संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याआधी सोन्याचे भाव ठरवतात.हे ठरवताना व्हॅट, लेव्ही तसंच उत्पादनासाठी येणारा खर्च हे सगळं विचारात घेतलं जातं. त्या शहरात ठरलेल्या भावानेच दिवसभर सोनं विकलं जातं.

या बँकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी, हे आहे कारण

या कारणामुळेच वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेच्या आधारावर ठरते. 22 कॅरट आणि 24 कॅरटच्या सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

================================================================================

First published:

Tags: Gold, Money