शेअर बाजारातल्या तेजीनंतर सोन्या-चांदीला नवी झळाळी, हे आहेत आजचे दर

शेअर बाजारातल्या तेजीनंतर सोन्या-चांदीला नवी झळाळी, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर आलेली तेजी आणि सोन्याला वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झालीय. सोन्याप्रमाणेच चांदीही महाग झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर आलेली तेजी आणि सोन्याला वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झालीय. सोन्याप्रमाणेच चांदीही महाग झाली आहे.

सोन्याचे दर 39 हजार 395 रुपये प्रतितोळा झाले आहेत. सोन्याचे दर 115 रुपयांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकी डॉलर कमजोर पडल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

सोन्याप्रमाणचे चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 270 रुपयांनी वाढून 47 हजार 900 प्रतिकिलो झाला.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांप्रमाणेच सोन्या-चांदीचे भावही बदलत राहतात. याची कारणं काय आहेत ते पाहूया.

1. सोन्याचे दर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असतात. जर आपल्या देशाने सोन्याच्या आयातीबदद्लचा नवीन नियम लागू केला तर त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होईल.

2. सोन्याची निर्यात करणाऱ्या देशात एखाद्या वर्षी उत्पादन घटलं तर त्याचा परिणाम घरगुती बाजारातल्या सोन्याच्या किंमतींवर होतो.

3. भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंमध्ये सोन्याचं ट्रेडिंग होतं. यामध्ये सोन्याच्या किंमती बदलत राहतात.

(हेही वाचा : पोस्टाच्या या योजनेचा दुहेरी लाभ, बचतही होणार आणि दर महिन्याला कमाईही)

4. सणासुदीच्या दिवसांत आणि लग्नाचे मुहूर्त असतानाही सोन्याला चांगली मागणी असते. त्यामुळेही सोन्याच्या किंमती वाढतात.

5. भारतात रिझर्व्ह बँकेने काही निर्णय घेतले तर त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होतो.

6. अमेरिकेसारख्या विकसित देशांच्या धोरणांमुळेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती बदलतात.

7. चलनात झालेल्या बदलांमुळेही सोनं स्वस्त किंवा महाग होतं.

===========================================================================================

VIDEO : सेनेला पाठिंबा का द्यायचा? सुशीलकुमार शिंदे म्हणतात...

First published: November 1, 2019, 5:57 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading