धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीला नवी झळाळी, हे आहेत आजचे दर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीला नवी झळाळी, हे आहेत आजचे दर

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. सोन्याचे दर 220 रुपयांनी वाढलेत. धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. सोन्याचे दर 220 रुपयांनी वाढलेत. आता सोन्याची किंमत 47 हजार680 रुपये प्रतितोळा झाली आहे. धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळेच सोन्याच्या किमतींमध्ये तेजी आली, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चांदीच्या किंमतींमध्येही 670 रुपयांची वाढ झालीय. चांदीचा दर 47 हजार 680 रुपये प्रतिकिलो झाला. याआधी चांदीचा दर 47 हजार 10 रुपये होता.

HDFC चे सिक्युरिटी अ‍ॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, दिल्लीच्या सराफ बाजारात 24 कॅरट सोन्याचा भाव 220 रुपयांनी वाढला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1 हजार 506 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव 18.05 डॉलर प्रतिऔंस झाला.

दिवाळीनंतर सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केडिया कमोडिटी चे एमडी अजय केडिया यांच्या मते, जागतिक मंदीमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत पण आता हा तणाव कमी झाला आहे. यामुळे दिवाळीनंतर लगेचच सोन्याच्या किंमतींमध्ये 3 ते 4 टक्के घसरण पाहायला मिळेल.

या स्थितीत गुंतवणूदारांसोबतच सामान्य लोकांनीही सोन्याच्या खरेदीत फार घाई करून चालणार नाही. सोनं स्वस्त असो की महाग, धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे आज सराफा बाजारात झुंबड उडणार आहे.

=====================================================================================

VIDEO : पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 25, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या