Gold Price today : 2 दिवसांनंतर पुन्हा बदलले सोन्याचे दर, उच्चांक, घसरण आणि तेजी

Gold Price today : 2 दिवसांनंतर पुन्हा बदलले सोन्याचे दर, उच्चांक, घसरण आणि तेजी

चीनच्या कोरोना व्हायरसचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित वाटतेय. या कारणानेच घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : चीनच्या कोरोना व्हायरसचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित वाटतेय. या कारणानेच घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याच्या किंमतीत 78 रुपयांची वाढ झालीय. सोन्याचे दर 43 हजार 513 रुपयांवर गेलेत. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमतीत 1 हजार रुपयांची घसरण झाली होती.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 27th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 43 हजार 513 रुपये प्रतितोळा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 649 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18.05 डॉलर प्रतिऔंस झाली.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 27th February 2020)

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही किरकोळ तेजी आलीय. 1 किलो चांदीचे दर 48 हजार 130 रुपयांवर गेलेत.

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, सुरक्षित गुंतवणुकीमुळे सोन्याला वाढती मागणी आहे. असं असलं तरी सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही.केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या मते, एखाद्याने गुंतवणूक केली असेल तर त्याचा फायदा वसूल केला पाहिजे.

(हेही वाचा : आश्चर्य! पृथ्वीला मिळाला आणखी एक चंद्र, छोट्या कारएवढा आहे आकार!)

चांदीमध्ये कमवा पैसे

सोन्याच्या ऐवजी आता चांदीमध्ये पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. सोनं आणि चांदीच्या किंमतीत जेव्हा मोठी घसरण होते आर्थिक संकटाची शक्यता वाढते. पण तुम्ही जर कोणत्या आर्थिक आणिबाणीत अडकला नाहीत तर सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवा.

सोन्याचं बिल आवश्यक

सोन्याची खरेदी करताना बिल अवश्य घ्या. इनकम टॅक्स रिटर्न भरताना या बिलाच्या मदतीने तुम्ही सोन्याचा सोर्स जाणून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही दाखल केलेल्या इनकम टॅक्स रिटर्न्सची तपासणी होते तेव्हा बिलाचा फायदा होऊ शकतो.

(हेही वाचा : कोरोना व्हायरसमुळे येऊ शकते आर्थिक मंदी, मूडीजच्या तज्ज्ञांचा अहवाल)

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

==============================================================================

First published: February 27, 2020, 5:38 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading