Gold Price Today : सोन्याचे दर घरसले, हे आहेत आजचे दर

Gold Price Today :  सोन्याचे दर घरसले, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. एका आठवड्यानंतर सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. एका आठवड्यानंतर सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 73 रुपयांनी कमी होणार आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही घसरण झालीय. एक किलो चांदीचा दर 156 रुपयांनी घटलाय. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते मागणी कमी असल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. सोन्याचे दर 39,882 हजार रु. प्रतितोळा झालेत. चांदीचा भाव 47,910 रु. प्रतिकिलो झालाय.

नव्या वर्षात स्वस्त होऊ शकतं सोनं

नव्या वर्षात म्हणजे 2020 मध्ये सोन्याच्या वाढलेल्या किंमती कमी होऊ शकतात. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच हा ट्रेंड पाहायला मिळतोय. तज्ज्ञांच्या मते, रुपया मजबूत झाल्याने आणि अमेरिका, चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चेमुळे आता सोनं आणखी स्वस्त होऊ शकतं.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

(हेही वाचा : LIC च्या या योजनेत मुलांसाठी वाचवा 206 रु., 27 लाख रुपये होतील जमा)

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

किंमतीबद्दल राहा सावधान

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

(हेही वाचा : तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलंय का? आता उरले फक्त 2 दिवस!)

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

==================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Dec 30, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या