Elec-widget

खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 102 रुपयांनी स्वस्त झालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 102 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचवेळी मागणी घटल्याने चांदीच्या किंमतीतही घसरण झाली.चांदीचे दर 815 रुपये प्रतिकिलोने खाली आले.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारविषयक चर्चेत सहमती झालीय. त्यामुळे सोन्याबरोबरच सुरक्षित गुंतवणुकीच्या इतर पर्यायांना मागणी घटलीय. त्याचबरोबर डॉलर मजबूत झालाय. त्यामुळे सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी घटले.दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याची किंमत 38 हजार 958 रुपये प्रतितोळा झाली.

का घटले सोन्याचे दर?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याला मागणी वाढल्यामुळे आता काही दिवसांत बाजारात तेजी येईल.पुढच्या 6 महिन्यांत सोन्याच्या किंमती वाढत राहतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.

(हेही वाचा : टोलसाठी आता नाही थांबावं लागणार रांगेत, गडकरींनी केली फास्टॅगची घोषणा)

Loading...

भारतीय स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लगार सोमैया कांति घोष म्हणाले, पुढच्या काही दिवसांत सोन्याचे भाव खाली येण्याची चिन्हं नाहीत.जागतिक बाजाराची स्थिती पाहिली तर या आर्थिक वर्षातल्या शेवटच्या सहा महिन्यांत सोन्याचे दर चढते राहतील. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळेही सोनं महाग होणार,असा अंदाज आहे.

========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Nov 22, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...