मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दोन दिवसांत सोनं आणि चांदी स्वस्त, लग्नसराईत सुवर्णसंधी

दोन दिवसांत सोनं आणि चांदी स्वस्त, लग्नसराईत सुवर्णसंधी

 रुपया मजबूत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती खाली आल्याने सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे लग्नसराईत ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

    नवी दिल्ली, 10 जानेवारी : रुपया मजबूत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती खाली आल्याने सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 846 रुपये प्रतितोळा इतके कमी झालेत. त्याचवेळी चांदी 200 रुपये प्रति किलोने स्वस्त झालीय. अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कोसळले आहेत. सोन्याचे नवे दर Gold Price 10 January 2020) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 40 हजार 554 रुपये प्रतितोळा झालेत. गेल्या दोनच दिवसांत सोन्याचे भाव तब्बल 846 रुपयांनी कमी झाले. चांदीचे नवे दर सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही (Silver Rate 10 January 2020)घसरण झालीय. चांदी 47 हजार 695 रुपये किलो झाली. चांदीचे भाव 1 हजार 348 रुपयांनी खाली आले. सोनं-चांदी का झाली स्वस्त? HDFC सिक्‍युरिटीजचे प्रमुख देवर्श वकील यांच्या नुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता नांदण्याच्या अपेक्षेने जगभरातले शेअर बाजार नव्या उंचीवर पोहोचलेत. गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी स्टॉक मार्केटकडे आहे. लग्नसराईच्या आधीत सोन्याच्या घसरलेल्या किंमती उद्योगासाठी चांगल्या आहेत. सोनं स्वस्त झाल्याने मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा : KYC करण्यासाठी आता जावं लागणार नाही बँकेत, RBI ने बदलला सगळ्यात मोठा नियम) वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. (हेही वाचा : घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार करू शकतं या करांमध्ये कपात) ==============================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    पुढील बातम्या