Gold Rates Today : सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, काय आहे कारण?

Gold Rates Today : सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, काय आहे कारण?

सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण आलीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 62 रुपयांनी घसरलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold-Silver Prices Today)मोठी घसरण आलीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 62 रुपयांनी घसरलेत.कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चिंतेचं वातावरण असल्याने सोन्याच्या भावातली घसरण थोडी रोखली गेलीय. त्याचवेळी चांदीच्या किंमतीत मात्र मोठी घसरण झालीय. एक किलो चांदीच्या किंमती (Silver Prices)828 रुपयांनी घसरल्या आहेत. मंगळवारी सोन्याच्या दरातही यावर्षीची सर्वात मोठी घसरण झाली होती.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 26th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 43 हजार 502 रुपये प्रतितोळा झाले.

चांदीचे नवे दर

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही घसरण झालीय. (Silver Rate on 26th February 2020)दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या किंमती 48 हजार 146 रु. प्रतिकिलो झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 684 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18.10 डॉलर प्रति औंस झाली.

(हेही वाचा : कोरोना व्हायरसमुळे येऊ शकते आर्थिक मंदी, मूडीजच्या तज्ज्ञांचा अहवाल)

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

1. तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

2. IBJA द्वारे ठरलेले दर देशात सर्वमान्य असतात. असं असलं तरी या रेट्समध्ये 3 टक्के GST नसतो.

3. असली सोनं 24 कॅरेटचं असतं पण त्याचे दागिने बनत नाहीत कारण ते मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरट सोनं वापरलं जातं. यामध्ये 91. 66 टक्के सोनं असतं.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

==============================================================================================

First published: February 26, 2020, 6:13 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading