कोरोना व्हायरसचा सोन्या-चांदीच्या किंमतींवर परिणाम पण भारतात सोनं महाग

कोरोना व्हायरसचा सोन्या-चांदीच्या किंमतींवर परिणाम पण भारतात सोनं महाग

तुम्ही ज्या किंमतीला सोनं खरेदी करता त्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. शहरांमधल्या सराफ संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याआधी सोन्याचे भाव ठरवतात.हे ठरवताना व्हॅट, लेव्ही तसंच उत्पादनासाठी येणारा खर्च हे सगळं विचारात घेतलं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : चीनबरोबरच आणखी काही देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने जगभरात हाय अलर्ट जारी झालाय. या व्हायरसचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवरही (Gold Price Today)पाहायला मिळाला. ग्राहकांच्या संख्येबाबत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये मागणी घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झालीय. असं असलं तरी देशी बाजारात रुपया कमजोर झाल्याने शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले. त्याचवेळी चांदीच्या किंमती 238 रुपयांनी वाढल्या आहेत.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 24rd January)

आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याचे भाव 40 हजार 780 रुपये प्रतितोळा झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 558 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीची किंमत 17. 80 डॉलर प्रतिऔंस झाली. आठवड्याच्या शेवटी चांदीचे भाव 47 हजार 277 रुपये किलो झालेत.

(हेही वाचा : SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट, या चुका करू नका नाहीतर रिकामं होईल बँक खातं)

HDFC सिक्युरिटीजचे तज्ज्ञ तपन पटेल यांच्या मते, भारतीय रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचवेळी कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींवर दबाव आहे.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही ज्या किंमतीला सोनं खरेदी करता त्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. शहरांमधल्या सराफ संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याआधी सोन्याचे भाव ठरवतात.हे ठरवताना व्हॅट, लेव्ही तसंच उत्पादनासाठी येणारा खर्च हे सगळं विचारात घेतलं जातं. त्या शहरात ठरलेल्या भावानेच दिवसभर सोनं विकलं जातं.या कारणामुळेच वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेच्या आधारावर ठरते. 22 कॅरट आणि 24 कॅरटच्या सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

(हेही वाचा : तुम्ही नोकरी करता की बिझनेस? इनकम टॅक्स वाचवण्यासाठी करा या 7 गोष्टी)

=========================================================================================

First published: January 24, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या