अपेक्षेप्रमाणेच सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे बदल, सोनंखरेदीत ही घ्या खबरदारी

अपेक्षेप्रमाणेच सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे बदल, सोनंखरेदीत ही घ्या खबरदारी

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेजीमुळे घरगुती बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोनं 150 रुपयांनी महाग झालंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेजीमुळे घरगुती बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Price Today) वाढल्या आहेत. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोनं 150 रुपयांनी महाग झालंय. त्याचवेळी चांदीच्या किंमतीत 140 रु. प्रतिकिलोची वाढ झाली आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वाढतील,अशी अपेक्षा पहिल्यापासूनच होती. असं असलं तरी सोन्यामध्ये पुढच्या एक महिन्यापर्यंत घसरण पाहायला मिळू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढून 1 हजार 560 डॉलर प्रतिऔंस झाली. त्याचवेळी चांदीची किंमत 17.70 डॉलर प्रति औंस झाली.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 6th February 2020)

दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 41 हजार 19 रुपये प्रतितोळा झाली. याचा अर्थ सोन्याच्या किंमतीत 150 रुपयांची वाढ झालीय.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 6 February 2020)

औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत.दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत 140 रुपये प्रतिकिलोची वाढ झाली. चांदीचा भाव 46,881 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

का महागलं सोनं-चांदी?

HDFC सिक्युरिटीजचे तज्ज्ञ तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने स्वदेशी बाजारात तेजी आलीय.

(हेही वाचा : जानेवारी महिन्यात त्याने दररोज कमावले 3 हजार कोटी रुपये, बेजोसलासुद्धा जमलं नाही)

सोनं घेताना घ्या खबरदारी

सोनं घेताना ज्वेलर्सनी लावलेल्या किंमतींवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा किंमतींवर परिणाम होतो. सोन्याची किंमत, घडणावळ, रत्नांचं मूल्य हे सगळं यात येतं. देशभरात सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी एकच परिमाण नाही. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे वेगवेगळे भाव असतात. प्रत्येक शहरात सराफांची संघटना एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवते. त्यामुळे या दरांमध्ये फरक पडतो.

(हेही वाचा : RBI च्या रेपो रेटचा तुमच्या FD वर होणार परिणाम, किती होणार फायदा?)

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

======================================================================================

First published: February 6, 2020, 6:54 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या