1 दिवसाच्या दिलाशानंतर आज सोनं पुन्हा महाग, चांदी मात्र स्वस्त

1 दिवसाच्या दिलाशानंतर आज सोनं पुन्हा महाग, चांदी मात्र स्वस्त

तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : रुपया कमजोर झाल्याने देशी बाजारात सोनं महाग झालंय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 63 रुपयांनी वाढले. औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीच्या किंमतीत (Silver Prices Today)93 रुपयांची घट झालीय.HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनुसार, जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने आणि रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी आलीय.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 23rd January)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 40,723 रुपये प्रतितोळा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 556 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीची किंमत 17.67 डॉलर प्रति औंस होती.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 23rd January)

चांदीच्या किंमतीत घसरण झालीय. सोन्याला मागणी कमी झाल्याने दर घटले होते. आता मात्र सोन्याचे दर वाढले आहेत.

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करार झाल्यानंतर गुंतवणूकदार दुसऱ्या टप्प्यातल्या कराराबद्दल सतर्क आहेत. यामध्ये सोन्याच्या भावात तेजी आली. चीनमधल्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळेही गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

(हेही वाचा : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं होणार फायदेशीर, बजेटमध्ये या करात होणार बदल?)

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

1. तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

2. IBJA द्वारे ठरलेले दर देशात सर्वमान्य असतात. असं असलं तरी या रेट्समध्ये 3 टक्के GST नसतो.

3. असली सोनं 24 कॅरेटचं असतं पण त्याचे दागिने बनत नाहीत कारण ते मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरट सोनं वापरलं जातं. यामध्ये 91. 66 टक्के सोनं असतं.

===============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Jan 23, 2020 05:42 PM IST

ताज्या बातम्या