सुवर्णसंधी! भाव घसरल्याने सोनेखरेदीसाठी लगबग, सोमवारचे भाव इथे पाहा

सुवर्णसंधी! भाव घसरल्याने सोनेखरेदीसाठी लगबग, सोमवारचे भाव इथे पाहा

सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्नसराईचे दिवस आहेत आणि यामध्ये सोनेखरेदीचं मुख्य काम असतं. त्यामुळे जर सोनेखरेदी करायची असेल आजचा दिवस 'सोन्यासारखा' आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्नसराईचे दिवस आहेत आणि यामध्ये सोनेखरेदीचं मुख्य काम असतं. त्यामुळे जर सोनेखरेदी करायची असेल आजचा दिवस 'सोन्यासारखा' आहे. कारण केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2020) सादर झाल्यानंतर एका दिवसातच सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे त्याचा परिणाम सोनेखरेदीवर झाला आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 281 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीत (Silver Price) प्रति किलो 712 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचांदीचे नवीन भाव

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 42 हजार 029 रुपयांवरून 41 हजार 748 रुपयांपर्यंत घसरले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडण्यात आला. त्यादिवशी सोन्याच्या किंमतीत 277 रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज सोन्या-चांदीचे दर कोसळले.

(हेही वाचा : आर्थिक क्षेत्रात अच्छे दिन, मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच सर्वाधिक वाढ)

औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणातही घसरण झाली आहे. सोमवारी चांदीची किंमत प्रति किलो 48 हजार 218 रुपयांवरून 47 हजार 506 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. बजेटच्या दिवशी चांदीच्या किंमतीत 483 रुपयांनी वाढ झाली होती.

दर कमी होण्याचं कारण

HDFC सिक्युरीटीजने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण झाल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

खरेदीदारांना सुवर्णसंधी

सोनेकर्ज देणारी मण्णपूरम फायनान्स (Manappuram Finance) या महिन्यात सोन्याचा लिलाव करणार आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील अनेक शहरांमध्ये 17 फेब्रुवारीला सोन्याचा लिलाव करण्यात येणार आहे. जवळपास 50 केंद्रांवर हा लिलाव होणार आहे.

First published: February 3, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या