Gold Price Today: 51 हजारांच्या जवळपास पोहोचले सोन्याचे दर, चांदीलाही झळाळी कायम

Gold Price Today: 51 हजारांच्या जवळपास पोहोचले सोन्याचे दर, चांदीलाही झळाळी कायम

Gold Silver Price, 5 January 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण पाहायला मिळाल्यामुळे सोन्याचांदीचे दर वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जानेवारी: भारतीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमती देखील वधारल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील सराफा बाजारात 05 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 335 रुपयांनी वाढले आहेत.  चांदीच्या दरात (Silver Price Today) 382 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 50,634 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदीचे दर 67,311 रुपये प्रति किग्रा होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर स्थीर आहेत.

सोन्याचे आजचे दर (Gold Price on 05th January 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर प्रति तोळा 335 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 50,969 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या तीन सत्रांमध्ये सोन्याचे दर वाढते होते. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 50,634 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,942 डॉलर प्रति औंस आहेत.

(हे वाचा-नवीन वर्षात खरेदी करा स्वत:चं आणि स्वस्त घर! ही बँक देते आहे संधी)

चांदीचे आजचे दर (Silver Price on 05th January 2021)

वर्षाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी चांदीमध्ये वाढ पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरांत किरकोळ 382 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 69,693 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे भाव 67,311 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market)चांदीचे भाव  27.30 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. काल देखील आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर हेच होते.

का महागले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल (कमोडिटीज) यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती स्थीर राहुनही देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती वाढल्या आहेत. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाले आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 13 पैशांनी कमी होऊन 73.15 रुपयांवर पोहोचला आहे. यामुळेच सोन्याचांदीच्या दरात उसळी आली आहे.

(हे वाचा- 2 भागांमध्ये असणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 29 जानेवारीपासून होणार सुरुवात)

त्याचप्रमाणे यावर्षी कोरोना काळात (Coronavirus Pandemic) सोन्याचांदीच्या दरात एकंदरीत वाढच पाहायला मिळाली. जाणकारांच्या मते, अनिश्चित अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 5, 2021, 7:04 PM IST

ताज्या बातम्या