Home /News /money /

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, चांदीही उतरली

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, चांदीही उतरली

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. तरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मुल्य घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीतही आज विक्रमी घसरण पाहायला मिळाली. इथे सविस्तर वाचा सोन्याच्या भावात मंगळवारी किती घसरण झाली.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी :  सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीतही आज विक्रमी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे आजचे भाव (Gold Price today) प्रति तोळा 388 रुपयांनी घसरले. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. ही सोन्याच्या किंमतीत झालेली फेब्रुवारी महिन्यातील सगळ्यात मोठी घट आहे. आज चांदीच्या किंमतीतही (Silver Prices Today) प्रति किलो 346 रुपयांची घसरण झाली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे भाव? दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 41 हजार 658 रुपयांवरुन घसरुन 41 हजार 270 रुपयांवर पोहोचले आहेत. आज सोन्याच्या भावात 388 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. (हेही वाचा : Budget 2020 : एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास तुमचे किती पैसे सुरक्षित?) त्यातच सोमवारी सोन्याच्या भावात 281 रुपयांची घसरण झाली होती. फेब्रुवारी महिन्यात केवळ बजेट (budget 2020)च्या दिवशी सोन्याचे भाव वधारलेले पाहायला मिळाले होते. त्यादिवशी सोन्याच्या भावात 277 रुपयांनी वाढ झाली होती. चांदी खरेदी करणाऱ्यांची ‘चांदी’ सोन्यापाठोपाठ चांदींचे भाव देखील कमी झाले आहेत. मंगळवारी चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीचे भाव प्रति किलो 346 रुपयांची घसरण झाली आहे. द्योगिक क्षेत्रात मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति किलो चांदीची किंमत 47 हजार 426 रुपयांवरुन 47 हजार 80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सोनेचांदीच्या भावात घसरण कशामुळे? HDFC सिक्युरीटीजचे सीनिअर अ‍ॅनालिस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या रुपयाच्या घसरणीमुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. त्याचप्रमाणे चीनच्या सेंट्रल बँकेमध्ये दिवाळखोरी जाहीर होऊ शकते. याच कारणाने देशभरातील शेअर मार्केटने पुन्हा उसळी घेतली असून गुंतवणूकदारांचा कल आता सोन्याकडे नसल्याचं दिसत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold prices, Gold rate, Silver jewelry

    पुढील बातम्या