फक्त 3 रुपयांनी वाढले सोन्याचे दर, चांदीच्या दरातही घसरण

फक्त 3 रुपयांनी वाढले सोन्याचे दर, चांदीच्या दरातही घसरण

सोन्याच्या दरात आज अगदी किरकोळ बदल झालाय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळ्याच्या सोन्याच्या भावात फक्त 3 रुपयांची वाढ झाली.चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : सोन्याच्या दरात आज अगदी किरकोळ बदल झालाय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळ्याच्या सोन्याच्या भावात फक्त 3 रुपयांची वाढ झाली.चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एक किलो चांदीचे दर 24 रुपयांनी घटले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1 हजार 510 डॉलर प्रतिऔंस झाले.

सोन्याचे आजचे दर

सोन्याचा दर 39 हजार 375 रुपये प्रतितोळा झाला आहे. बुधवारी सोन्याचा दर 39 हजार 372 रुपये प्रतितोळा होता.

चांदीची नवी किंमत

चांदीची किंमत 47 हजार 120 किलो झाली आहे. चांदीच्या दरात 24 रुपयांची घट झाली. HDFC सिक्युरिटीज चे सिनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, अमेरिका आणि चीनमध्ये आजपासून व्यापारविषयक चर्चा सुरू होतेय. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचाच कल राहील. अमेरिका - चीन यांच्यातली व्यापारविषयक चर्चा, ब्रेक्झिटची चिंता आणि कमजोर आर्थिक माहिती ही याची कारणं आहेत.

(हेही वाचा : 'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव)

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही ज्या किंमतीत सोन्याची खरेदी करता ती स्पॉट प्राइस असते. बहुतांश शहरांमध्ये सराफ असोसिएशनचे सदस्य एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवतात. यामध्ये व्हॅट, लेव्ही हे सगळं धरून भाव ठरवले जातात. याशिवाय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत शुद्धतेच्या आधारे ठरते. 22 कॅरट आणि 24 कॅरट सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

============================================================================================

परळीत मला भीती वाटते, पंकजा मुंडेंचं मोठं विधान, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 10, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या