खूशखबर! या 2 कारणांमुळे सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

खूशखबर! या 2 कारणांमुळे सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झालीय. सोन्याला कमी मागणी आणि रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याचे भाव 10 रुपयांनी खाली आले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही घटल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झालीय. सोन्याला कमी मागणी आणि रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याचे भाव 10 रुपयांनी खाली आले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही घटल्या. एक किलो चांदीचे भाव 128 रुपयांनी खाली आले. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 38 हजार 460 रुपये प्रतितोळा झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1 हजार 463 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 16.62 डॉलर प्रतिऔंस झाले.

चांदीही झाली स्वस्त

चांदीही स्वस्त झाली असून आता एक किलो चांदीचा दर 44 हजार 607 रुपये झाला आहे. HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, सोन्याला घरगुती बाजारात कमी झालेली मागणी आणि रुपया मजबूत झाल्यामुळेच हे भाव घटले.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळतेय.

(हेही वाचा : मोदी सरकार वाढवणार GST चे दर, या वस्तू होणार महाग)

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा. सोन्याच्या विक्रीसाठी आता हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात आलं आहे.

==================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 10, 2019, 5:28 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading