या 2 कारणांमुळे सोन्याला आली झळाळी, चांदीची चमक मात्र कमी

या 2 कारणांमुळे सोन्याला आली झळाळी, चांदीची चमक मात्र कमी

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Prices Today)मोठी तेजी आलीय. रुपया कमजोर झाल्याने आणि जागतिक स्तरावरची आर्थिक स्थिती पाहिली तर दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. एक तोळा सोन्याचे भाव 54 रुपयांनी वाढलेत. असं असलं तरी चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. एक किलो चांदीचा भाव (Silver Prices)56 रुपयांनी कमी झालाय.

सोन्याचे नवे दर (Gold Prices on 21st January)

दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे भाव 40 हजार 807 रुपये प्रतितोळा झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1 हजार 559 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18 डॉलर प्रतिऔंस झाली.

चांदीचे नवे दर (Silver Prices on 21st January)

सोन्याच्या तुलनेत चांदीचे भाव मात्र घसरले आहेत. चांदीचे भाव 47 हजार 804 रुपये प्रतिकिलो झालेत. HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घट आली आहे. रुपया 11 पैशांनी कमी झालाय. सुरुवातीच्या व्यवहारात डॉलर 71. 17 वर आला होता. घरगुती बाजारात शेअर बाजार कमजोर पडल्याने रुपया कमकुवत झाला.

(हेही वाचा : हे पेमेंट वॉलेट होणार बंद, लवकरच काढून घ्या पैसे, नाहीतर बसेल गंडा)

सोनं खरेदी करताना घ्या खबरदारी

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

किंमतीबद्दल राहा सावधान

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

(हेही वाचा : Zomato ने Uber Eats ने घेतलं विकत, कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार)

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत. शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

===================================================================================

First published: January 21, 2020, 5:06 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या