नवी दिल्ली, 26 जून : गुरुवारी सोन्याच्या किंमती काहीशा कमी झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. गुरूवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,137 रुपये प्रति तोळा इतके होते. तर यामध्ये बुधवारपेक्षा 438 रुपयांची घसरण झाली होती. दरम्यान आज व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात सोने आणखी उतरले होते. सकाळच्या सत्रात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव सोन्याचे भाव प्रति तोळा 40,043 रुपयांवर पोहोचले होते. मात्र बाजार बंद होत असताना सोन्याचे भाव वाढले आहेत, त्यावेळी सोन्याचे भाव प्रति तोळा 48,234 रुपयांवर पोहोचले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion & Jewellers Association Ltd) सोन्याचे नवे भाव दिले आहेत. दरम्यान हे भाव जीएसटीशिवायचे आहेत.
विविध प्रकारच्या शुद्धतेच्या सोन्याचे काय आहेत आजचे भाव
-24 कॅरेट : 48,234 रुपये प्रति तोळा
-23 कॅरेट : 48,041 रुपये प्रति तोळा
-22 कॅरेट : 44,182 रुपये प्रति तोळा
-18 कॅरेट : 36,176 रुपये प्रति तोळा
-14 कॅरेट : 28,217 रुपये प्रति तोळा
#Gold and #Silver Closing #Rates for 26/06/2020#IBJA pic.twitter.com/835uRkmfvI
— IBJA #StayHomeStaySafe (@IBJA1919) June 26, 2020
दरम्यान आज चांदीचे भाव देखील मोठ्या फरकाने कमी झाले आहेत. गुरूवारी चांदीचे भाव 47,585 रुपये प्रति किलो इतके होते. तर आज चांदी प्रति किलो 300 रुपयांनी कमी झाली आहे. आज चांदीचे भाव प्रति किलो 48, 285 रुपयांवर पोहोचले आहेत.
(हे वाचा-अलर्ट! SBI, PNB पाठोपाठ या सरकारी बँकेने दिला सायबर हल्ल्याचा इशारा)
(हे वाचा- नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता)
लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीने असे अनेक रेकॉर्ड रचले आहेत परिणामी लवकरच सोन्याच्या किंमती 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते कोरोना व्हायरस पँडेमिक, भारत-चीन संघर्ष आणि अमेरिकी बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर न वाढवण्याचा घेतलेला निर्णय, या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढता आहे.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver prices today, Gold and silver rates today, Gold rates today