मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rates Today: सोन्याच्या दराचा चढता ग्राफ! चांदीही 1185 रुपयांनी महागली; हे आहेत नवे दर

Gold Rates Today: सोन्याच्या दराचा चढता ग्राफ! चांदीही 1185 रुपयांनी महागली; हे आहेत नवे दर

Gold Silver Price, 16 December 2020: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती आज वधारल्या आहेत. चांदीच्या किंमती देखील आज मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Gold Silver Price, 16 December 2020: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती आज वधारल्या आहेत. चांदीच्या किंमती देखील आज मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Gold Silver Price, 16 December 2020: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती आज वधारल्या आहेत. चांदीच्या किंमती देखील आज मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

  नवी दिल्ली, 16 डिसेंबर: देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 16 डिसेंबर 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 215 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या किंमती आज पुन्हा 1000 रुपयांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. एक किलो चांजीच्या किंमतीत आज (Silver Rates Today) 1,185 रुपयांची वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सोन्याचे दर 48,844 रुपये प्रति तोळावर ट्रेड करणं बंद झालं होतं, तर चांदी 63,637 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आणि रुपयामध्ये घसरण झाल्यामुळे भारतामध्ये सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी आली आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price, 16 December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 215 रुपये प्रति तोळाने वधारले आहेत. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,059 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 48,844 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,854 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-महिंद्रा समुहाच्या कंपनीवर कर्जाचा डोंगर,तोट्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड अयशस्वी) चांदीचे नवे दर  (Silver Price, 16 December 2020) सोन्यापाठोपाठ आज चांदीमध्येही चांगली वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरांनी 1185 रुपयांची उसळी घेतली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 64,822 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव  24.72 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. (हे वाचा-ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! साखर निर्यातीबाबत मोठा निर्णय) का वाढल्या सोन्याचांदीच्या किंमती? एसडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities)चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे देशांतर्गत बाजारातही त्याचा परिणाम झाला आहे. अमेरिकेमध्ये प्रोत्साहन पॅकेजच्या घोषेणेची प्रतीक्षाही गुंतवणूकदारांना आहे. यामुळे डॉलरवर दबाव आहे आणि गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याचांदीच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. मात्र याचवेळी कोरोना लशीसंदर्भात सकारात्मक बातम्यांमुळे सोन्यावर दबाव देखील आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Gold, Gold and silver prices today

  पुढील बातम्या