नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 85 रुपयांनी कमी झालेत. सोन्यासोबतच चांदीही 290 रुपयांनी स्वस्त झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 38 हजार 775 रुपये प्रतितोळा झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर सोन्याचे दर 1 हजार 470 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदी 16.88 डॉलर प्रतिऔंस झाला. चांदीचा दर 45 हजार 250 रुपये प्रतिकिलो झाला.
का घटले सोन्याचे दर ?
HDFC सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, दिल्लीत 24 कॅरट सोन्याची स्पॉट प्राइस 85 रुपयांनी कमी झालीय. रुपयाची घसरण झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झालाय. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक सकारात्मक चर्चा झाल्यामुळेही गुंतवणूकदारांना आशा निर्माण झालीय.
सोन्याचे भाव असे ठरतात
सोन्याची खरेदी करताना सराफावर अंधपणे विश्वास ठेवून चालत नाही. सोन्याची मूळ किंमत, घडणावळीचे दर अशा घटकांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होतो. सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी पूर्ण देशात एकच निकष नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.
सोन्याचं बिल बनवण्यासाठीही कोणतीही एक पद्धत नाही. प्रत्येक सराफाकडची बिलिंग यंत्रणा वेगवेगळी आहे. त्या त्या शहरातली सराफ संघटना एकत्र येऊन रोज सकाळी सोन्याचे दर ठरवतात. त्यामुळे प्रत्येक शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.
======================================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा