मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold price today : सोनं आणि चांदीला नवी झळाळी, का झाले दरात बदल?

Gold price today : सोनं आणि चांदीला नवी झळाळी, का झाले दरात बदल?

HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनुसार, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांत आलेले चढउतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झालेलं सोनं याचा परिणाम स्वदेशी बाजारपेठेवर झालाय.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीचे भाव वाढलेत. सोन्याच्या भावात 52 रुपयांची वाढ झाली तर चांदीचे भाव 190 रुपयांनी वाढले. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनुसार, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांत आलेले चढउतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झालेलं सोनं याचा परिणाम स्वदेशी बाजारपेठेवर झालाय.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 10th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 41 हजार 508 रु. प्रतितोळा झाले.

चांदीही महाग (Silver Price on 10th February 2020)

सोन्याप्रमाणेच चांदीही महाग झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 47,396 रुपये प्रतिकिलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 हजार 574 डॉलर प्रतिऔंस तर चांदी 17.80 डॉलर प्रतिऔंस झाली.

सोनं घेताना घ्या खबरदारी

सोनं घेताना ज्वेलर्सनी लावलेल्या किंमतींवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा किंमतींवर परिणाम होतो. सोन्याची किंमत, घडणावळ, रत्नांचं मूल्य हे सगळं यात येतं. देशभरात सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी एकच परिमाण नाही. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे वेगवेगळे भाव असतात. प्रत्येक शहरात सराफांची संघटना एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवते. त्यामुळे या दरांमध्ये फरक पडतो.

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

=============================================================================

First published:

Tags: Gold, Money