कोरोना व्हायरसमुळे सोनं झालं महाग, चांदीलाही आली नवी चमक

कोरोना व्हायरसमुळे सोनं झालं महाग, चांदीलाही आली नवी चमक

दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 133 रुपयांनी वाढली आहे. त्याचवेळी चांदीच्या किंमतीतही तेजी आलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : चीनमधल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (China Carnivorous)परिणाम जगभरात दिसू लागला आहे. शेअर बाजारातल्या घसरणीमुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांचा (Gold-Silver Price Today)सोन्याकडे कल आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 133 रुपयांनी वाढली आहे. त्याचवेळी चांदीच्या किंमतीतही तेजी आलीय. एक किलो चांदीचे भाव 238 रुपयांनी वाढलेत.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 27th January)

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोन्याचे दर 41 हजार 292 रुपये झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 578 डॉलर प्रतिऔंस झालीय. चांदीची किंमत 18.15 डॉलर प्रतिऔंस झालीय.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 27th January)

सोमवारच्या सत्रात चांदीचे दर 47 हजार 277 रुपये प्रतितोळा झाली.

(हेही वाचा : ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार्जेस वाढल्यामुळे खाणं झालं महाग)

का महागलं सोनं-चांदी ?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांच्या अनुसार अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम झालाय. चीनमध्ये आलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आर्थिक अनिश्चतता आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. या कारणानेही सोनं महाग झालंय.

(हेही वाचा : बजेटमधून सर्वसामान्यांना मिळू शकतो मोठा दिलासा, टॅक्स स्लॅब कमी होणार?)

चिनी प्रवासी भारतीय अर्थव्यवस्थेत 76 कोटी डॉलरचं योगदान देतात. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून इथे आलेल्या प्रवाशांच्या संख्येत घट होईल. यामुळे सिंगापूर, थायलंड आणि हाँगकाँगच्या पर्यटन क्षेत्रावर वाईट परिणाम होईल. भारतीय पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये चीनमधून 2 लाख 81 हजार 768 प्रवासी भारतात आले होते. आता या संख्येत मोठी घट होईल.

=============================================================================================

First published: January 27, 2020, 5:12 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या