सोन्याचे रेकॉर्डब्रेक भाव! हे आहेत आजचे दर

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 40 हजार रुपयांच्या वर जाणार, असा तज्ज्ञांचा अंदाज होता आणि झालंही तसंच. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 10 ग्रॅमला 40 हजार 220 रुपये झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 07:25 PM IST

सोन्याचे रेकॉर्डब्रेक भाव! हे आहेत आजचे दर

मुंबई, 29 ऑगस्ट : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 40 हजार रुपयांच्या वर जाणार, असा तज्ज्ञांचा अंदाज होता आणि झालंही तसंच. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 10 ग्रॅमला 40 हजार 220 रुपये झाला आहे. सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरांनीही उसळी घेतली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो 49 हजार 50 रुपये झाले आहेत.

लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. डॉलर मधल्या चढउतारांबरोबरच अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.सोन्यामधली गुंतवणूक लोक सुरक्षित मानत आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली. परिणामी सोन्याचे भाव वाढले.

का वाढले सोन्याचे भाव ?

1. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे लोक सोन्यामधल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत.

Loading...

2. रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका पुढच्या काही महिन्यांत 374 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील, असा अंदाज आहे. RBI ने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली.

खाजगी संभाषण ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कंपनीने टाकलं काढून

3. अमेरिकेने गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हाजेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, असा ट्रेंड आहे. आत्ताही तसंच चित्र पाहायला मिळालं.

4. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाचा जगालाच फटका बसला आहे. जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातलं चलन कमकुवत झालं आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली.

5. अमेरिका आणि इराणमध्येही तणाव निर्माण झालाय. अशा स्थितीत लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत.

===================================================================================================

VIDEO: लालबागमध्ये राम मंदिराचा देखावा, पाहा EXCULSIVE दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Aug 29, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...