Gold Silver Price: दोन दिवसानंतर सोन्याचांदीला पुन्हा झळाली, वाचा आजचे नवे दर

Gold Silver Price: दोन दिवसानंतर सोन्याचांदीला पुन्हा झळाली, वाचा आजचे नवे दर

देशात आज सोन्याचांदीचे दर वधारल्याचे (Gold Silver Prices Raised) पाहायला मिळते आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याचे दर 224 रुपये प्रति तोळाने वाढून 52,672 रुपये झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : देशात आज सोन्याचांदीचे दर वधारल्याचे (Gold Silver Prices Raised) पाहायला मिळते आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याचे दर 224 रुपये प्रति तोळाने वाढून 52,672 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या किंमतीत प्रति किलो 620 रुपयांची तेजी आली आहे. यानंतर चांदीचे दर 69,841 रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुवारी सोन्याचांदीचे भाव घसरले होते. गुरुवारी चांदीचे दर 1,214 रुपये प्रति किलोग्रामने उतरले होते.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 18th September 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते सोन्याचे भाव आज 224 रुपयांनी वाढून 52,672 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधी गुरुवारी सोन्याचे भाव 608 रुपयांनी घसरले होते. गुरुवारी सोन्याचे दर 52,463 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,954 अमेरिकी डॉलर प्रति औंस आहेत.

चांदीचे नवे दर (Silver Price on 18th September 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते आज चांदीचे भाव 620 रुपये प्रति किलोने वाढून 69,841 रुपये प्रति किलोग्रामवर आली आहे. गुरुवारी चांदीचे दर 1,214 रुपये प्रति किलोने कमी झाले होते. त्यानंतर 69,242 रुपये प्रति किलोग्रामवर चांदीचे दर बंद झाले होते. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 27.13 डॉलर प्रति औंस आहेत.

का वाढले सोन्याचांदीचे दर?

एचडीएफसी सिक्योरिटीज के वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल  यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्यामुळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.

(हे वाचा-गुगल प्ले स्टोअरवरून Paytm हटवल्यानंतर ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?)

जगभरात चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा मोठा खरेदीदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी लावण्यात येतो. भारतात यावर्षी सोन्याची किंमत जवळपास 30 टक्क्यांनी वाढली आहे. भारतात सोन्याची आयात ऑगस्टमध्ये वाढून 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी गेल्यावर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलर होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 6:21 PM IST

ताज्या बातम्या