सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, चांदीही झाली महाग, ही आहेत 5 कारणं

सोन्याच्या दरात बुधवारीही विक्रमी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तेजीमुळे सोन्याचे भाव 50 रुपयांनी वाढले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा दर 38 हजार 820 रुपये झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 05:30 PM IST

सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, चांदीही झाली महाग, ही आहेत 5 कारणं

मुंबई, 21 ऑगस्ट : सोन्याच्या दरात बुधवारीही विक्रमी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तेजीमुळे सोन्याचे भाव 50 रुपयांनी वाढले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा दर 38 हजार 820 रुपये झाला आहे.

सोन्यासोबतच चांदीचे भावही वाढले आहेत. एकाच दिवसात चांदीचे भाव 1 हजार 140 रुपयांनी वाढले आणि 45 हजार 40 रुपये प्रतिकिलो एवढे झाले.

का वाढले सोन्याचे भाव ?

1. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे लोक सोन्यामधल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत.

2. रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका पुढच्या काही महिन्यांत 374 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील, असा अंदाज आहे. RBI ने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली.

Loading...

नोकरदारांना मोदी सरकार देणार खूशखबर! 2 मोठ्या निर्णयांची शक्यता

3. अमेरिकेने गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हाजेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, असा ट्रेंड आहे. आत्ताही तसंच चित्र पाहायला मिळालं.

4. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाचा जगालाच फटका बसला आहे. जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातलं चलन कमकुवत झालं आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली.

5. अमेरिका आणि इराणमध्येही तणाव निर्माण झालाय. अशा स्थितीत लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत.

==========================================================================================================

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...