दिवाळीच्या दिवसांत चांदी झाली स्वस्त, सोन्याचे काय आहेत दर?

दिवाळीच्या दिवसांत चांदी झाली स्वस्त, सोन्याचे काय आहेत दर?

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये 5 रुपयांनी वाढ झाली तर चांदीचे दर खाली आले आहेत. चांदीचा भाव 91 रुपयांनी कमी झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये 5 रुपयांनी वाढ झालीय तर चांदीचे दर खाली आले आहेत. चांदीचा भाव 91 रुपयांनी कमी झाला आहे.

HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याचा भाव 39 हजार 105 रुपये प्रतितोळा झाला आहे.

जागतिक स्तरावर सोन्याची किंमत 1 हजार 493 डॉलर प्रतिऔंस झाली. चांदीचे भाव 17. 62 डॉलर प्रतिऔंस झाले.

चांदीची चमक उतरली

चांदीच्या किंमतीत घसरण झाली असून हे दर 46 हजार 809 रुपये प्रतिकिलो झाले.  डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याचे दर वाढले, असं तज्ज्ञांचं मत आहे.

विक्रमी दरवाढ

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली होती. गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे.

(हेही वाचा : सोनं खरेदी करताय? सावधान! पावडर मिसळून विकलं जातंय सोनं)

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

=========================================================================================

बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरेंचा पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 15, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या