Elec-widget

सोनं आणि चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर

जागतिक बाजारात मिळालेले संकेत आणि रुपया कमजोर झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 348 रुपयांनी वाढला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : जागतिक बाजारात मिळालेले संकेत आणि रुपया कमजोर झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 348 रुपयांनी वाढला आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे दर वाढले आहेत. चांदीच्या किंमतीत वाढ होऊन हे दर 1 हजार 630 रुपये प्रतिकिलो झाला आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने दिल्लीचा सराफा बाजार बंद होता.

सोन्याचे नवे दर

सोन्याचे दर 39 हजार 115 रुपये प्रतितोळा झाले. आंततरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर 1 हजार 501 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीचे दर 17. 61 डॉलर प्रतिऔंस झाले.

चांदीला आली चमक

चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली असून दिल्लीच्या सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 47 हजार 580 रुपये झाला आहे. चांदीच्या दरात 1 हजार 630 रुपयांची वाढ झाली.

Loading...

का वाढले सोन्याचे भाव ?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. रुपयाच्या दरात घसरण झाली की लोक सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सोन्याचे दर वाढतात.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ATM मधून विनाशुल्क पैसे काढण्याचा नियम बदलला)

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

==========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...