कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर सोनं-चांदी झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर सोनं-चांदी झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्याने देशातही सोन्याच्या दरात घट झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 196 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्याने देशातही सोन्याच्या दरात घट झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 196 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 956 रुपयांची घट झालीय. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीतली घट आता रोखली जाऊ शकते. एकदोन दिवसांत पुन्हा सोन्याच्या किंमती वाढू शकतील, असा अंदाज आहे.दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 38 हजार 706 रुपये प्रतितोळा झाले आहेत. चांदीची किंमत 45 हजार 498 रुपये प्रतिकिलो झालीय.

(हेही वाचा : खूशखबर ! 1 जानेवारीपासून बँकांच्या बचत खात्यांवर मिळणार ही सुविधा)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 471 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचे दर 17.06 डॉलर प्रतिऔंस झालीय.जगभरातल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. या स्थितीत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा नाही.

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया सांगतात, सोन्याची खरेदी करताना कधीही हॉलमार्क ज्वेलरी घेतली पाहिजे. हे हॉलमार्किंग ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड करत असते. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुणवत्तेची चाचणी ही संस्था करते. ज्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल ते सोनं शुद्ध असतं. सोन्याचे दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही घेतलं पाहिजे.

==========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Nov 8, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या