मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शुक्रवारी कमी झाले सोन्याचांदीचे भाव, जाणून घ्या काय आहे आजची किंमत

शुक्रवारी कमी झाले सोन्याचांदीचे भाव, जाणून घ्या काय आहे आजची किंमत

आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमती काही प्रमाणात कमी झालेल्या पाहायला मिळाल्या. तरी देखील सोन्याचे दर 49 हजारांच्या जवळपास तर चांदीचे तर 50 हजारांच्या वर आहेत.

    नवी दिल्ली, 16 जुलै : गुरुवारी सोन्याच्या दरामध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. सोन्याचे भाव आज प्रति तोळा 68 रुपयांनी वधारले आहेत. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यामध्ये झालेली वाढ आहे. त्याचप्रमाणे विविध शुद्धतेच्या सोन्याचे दरही बुधवारपेक्षा काहीशा फरकाने वाढले आहेत. दरम्यान आज चांदीमध्ये प्रति किलो 45 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion and Jewellers Association Ltd.) वेबसाइटनुसार हे दर आहेत. दरम्यान हे भाव जीएसटी वगळता आहेत. सकाळच्या सत्रातील एक सोन्या-चांदीचे भाव असून यामध्ये बाजार बंद होत असताना काहीसा बदल होऊ शकतो. शुक्रवारी हे आहेत सोन्याचे भाव (Gold Rates on 17th July 2020) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यामध्ये शुक्रवारी 182 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानंतर सोन्याचे भाव आज प्रति तोळा 49,085 रुपये इतके आहे. तर 23 कॅरेट सोन्याची किंमत देखील 182 रुपयांनी कमी झाली आहे. परिणामी या शुद्धतेच्या सोन्याचे दर 48, 888 रुपये प्रति तोळा झाले आहेत. त्याचप्रमामे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये अनुक्रमे 167 आणि 136 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी या प्रकारच्या शुद्धतेची किंमत अनुक्रमे 44962 रुपये प्रति तोळा आणि 36814 रुपये प्रति तोळा झाली आहे. शुक्रवारी हे आहेत चांदीचे भाव (Silver Rates on 17th July 2020) गुरूवारी बाजार बंद होत असताना चांदीचे भाव 52,085 रुपये प्रति किलो होते. यामध्ये आज तब्बल 340 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी आजचे चांदीचे भाव 51,745 रुपये प्रति किलो झाले आहेत. गेल्या काही दिवसात चांदीचे भाव वाढत चालले आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटकाळात हे दर 50 हजारांच्या वर राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या