खूशखबर! रेकॉर्डब्रेक वाढीनंतर सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

खूशखबर! रेकॉर्डब्रेक वाढीनंतर सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या किंमतींमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली होती. आता मात्र सोन्याचे दर थोडे खाली आले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 39 हजार 720 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या किंमतींमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली होती. आता मात्र सोन्याचे दर थोडे खाली आले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 39 हजार 720 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारविषयक सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आर्थिक क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी घटली आहे.त्यामुळे सोन्याचे दर खालावले.

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाला झटका, GDP ची घसरगुंडी

गुरुवारी सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढून 40 हजार 220 रुपये झाले होते. सोन्याने 40 हजारांचा आकडा पार केल्यामुळे सगळेजण धास्तावले होते. चांदीच्याही किंमती वाढल्या होत्या पण आता चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. चांदीचा भाव 48 हजार 600 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

जागतिक मंदीमुळे सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित मानली जात होती. त्यामुळे सोन्याला प्रचंड मागणी होती. याचमुळे भावही गगनाला भिडले होते. आता सोन्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

असं असलं तरी जागतिक स्तरावरची स्थिती पाहिली तर सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मोदी सरकारचा मेगाप्लॅन : 30 रुपयांच्या कार्डवर होणार कॅन्सरचे उपचार

=====================================================================================================

शरद पवार पत्रकार परिषदेत भडकले, पत्रकाराला जाण्यास सांगितले, पाहा हा VIDEO

First published: August 30, 2019, 7:20 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading