खूशखबर! रक्षाबंधनच्या आधी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किंमतीतही घट

खूशखबर! रक्षाबंधनच्या आधी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किंमतीतही घट

सोनं आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे आता सोन्याच्या आणि चांदीच्या राख्या खरेदी करायलाही हरकत नाही. रक्षाबंधनच्या मुहूर्तावर भाऊही बहिणीसाठी एखादा छानसा दागिना घेऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : उद्याच्या रक्षाबंधनच्या आधी सोन्याच्या किंमतीत घट झालीय. बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 37 हजार 945 रुपये इतके होते. परदेशात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सध्या सोन्याची मागणी कमी झाल्याने किंमतीत 425 रुपयांची घट झाली आहे. त्याबरोबरच चांदीच्या किंमतीत 690 रुपयांची घट झाल्याने चांदी 44 हजार 310 रु. किलो झाली आहे.

जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 1,509.09 डॉलर प्रति औंस होता तर चांदीचा भाव 17.22 डॉलर प्रति औंस वर स्थिरावला.

दिल्लीमध्ये बुधवारी 8 ग्रॅमच्या गिन्नीचा भाव 100 रुपयांनी खाली येऊन 28,700 रुपये झाला.

इथे गुंतवणूक केलीत तर 2 वर्षांत दुप्पट होतील तुमचे पैसे

चांदीच्या किंमतीत 690 रुपयांची घट होऊन हा भाव 44 हजार 310 रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या नाण्यांच्या किंमतीत 1 हजार रुपयांची घट झाली आहे.

यावर्षी सोन्याच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली. वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 31,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. हा भाव गेल्या 8 महिन्यांत 38 हजार रुपयांवर गेला.

सोनं आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे आता सोन्याच्या आणि चांदीच्या राख्या खरेदी करायलाही हरकत नाही. रक्षाबंधनच्या मुहूर्तावर भाऊही बहिणीसाठी एखादा छानसा दागिना घेऊ शकतात.

केळी,अंड्यांच्या बिलांची सरकारने घेतली दखल,हॉटेलांवर होणार कारवाई

=====================================================================================

पूरग्रस्त भागात दुधामध्ये मिसळतंय नदीचे पाणी? VIRAL VIDEOचं हे आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Aug 14, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या