खूशखबर! सोनं आणि चांदी झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

खूशखबर! सोनं आणि चांदी झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने 5 वर्षांतला उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांनी सोन्यामधल्या गुंतवणुकीला पसंती दिल्यामुळे ही स्थिती होती. आता मात्र घटलेल्या दरांमुळे दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : जागतिक बाजारातली मंदी आणि सराफा व्यावसायिकांकडून असलेली कमी मागणी यामुळे सोन्याचे दर घटले आहेत. शनिवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 100 रुपयांची कपात झाली असून आता हे दर 38 हजार 570 रुपये प्रतितोळा झाले आहेत. शनिवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 38 हजार 670 रुपये होते.

चांदीच्या किंमतीतही 50 रुपयांची घट झाली आहे. आता चांदीचा दर प्रतिकिलो 45 हजार रुपये आहे.

जागतिक स्तरावर घट

जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात घट झाली. सोन्याचा दर 1 हजार 499 रुपये प्रतिऔंस एवढा झाला आहे तर चांदीचा भाव 17 डॉलर प्रतिऔस आहे.

आता सणासुदीच्या दिवसांत सोन्याचांदीचे दर घटल्यामुळे खरेदीतही वाढ होणार आहे. सराफ व्यावसायिकांकडून सोन्याचांदीला सध्या कमी मागणी आहे.

सणासुदीच्या दिवसात दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने 5 वर्षांतला उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांनी सोन्यामधल्या गुंतवणुकीला पसंती दिल्यामुळे ही स्थिती होती. आता मात्र घटलेल्या दरांमुळे दिलासा मिळाला आहे.

भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे.

खूशखबर! SBI होमलोन ग्राहकांना देणार भेट, EMI होऊ शकतो कमी

=============================================================================================

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2019 05:56 PM IST

ताज्या बातम्या