मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Rate Today : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं महाग की स्वस्त, खरेदी करण्याआधी इथे चेक करा दर

Gold Rate Today : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं महाग की स्वस्त, खरेदी करण्याआधी इथे चेक करा दर

Gold 1

Gold 1

Gold silver rate : तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर चेक करा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : गुढीपाडव्याला सोनं खरेदी केली जाते. आजचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी होते. तुम्ही जर सोनं खरेदी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर चेक करा.

एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 6,000 रुपये आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचे दर 48,000 आणि 1 तोळे सोन्यासाठी आज ग्राहकांना 60,000 रुपये मोजावे लागणार आहेत. काल मार्केट बंद होताना सोन्याचे दर उतरले होते. 1 तोळे सोन्याचा कालचा दर 59,780 रुपये होता.

22 कॅरेट सोन्याचे दर नेमके कसे आहेत?

१ ग्रॅम 5,500

8 ग्रॅम 44,000

10 ग्रॅम 55,000

गुढीपाडव्यालाच का खरेदी केलं जातं सोनं? काय आहे कारण?

रिटेल बाजारात ९९९ शुद्धतेच्या सोन्याचे दर 57 हजार 888 रुपये झाले आहेत. तर 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर 57 हजार 757 रुपये आहे. RTGS आणि GST पकडून ९९९ शुद्धतेच्या सोन्याचे दर 60 हजार155 रुपये झाले आहेत. तर 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर 59 हजार 695 रुपये आहे.

Gold Rate Today : श्रीमंत करणार सोनं! जुलैपर्यंत होऊ शकतं इतकं महाग, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

मंगळवारच्या तुलनेत गुढीपाडव्याला म्हणजे आज 200 रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत. गुढीपाडव्याला सोन्याला नवीन झळाळी मिळाली आहे. तर येत्या काळात म्हणजेच जुलै अखेरपर्यंत हेच दर 65 हजारापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महिन्याभरात सोनं जवळपास अडीच हजार रुपयांनी वधारलं आहे.

First published:
top videos

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today