सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहेत गुरुवारचे भाव

सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहेत गुरुवारचे भाव

देशातील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : एक दिवस आधी सोन्याच्या किंमतीनी रेकॉर्ड रचल्यानंतर सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,575 रुपये प्रति तोळा इतके होते. तर यामध्ये आज बुधवारपेक्षा 438 रुपयांची घसरण होत सोन्याचे भाव प्रति तोळा 48,137 रुपयांवर पोहोचले आहेत. बाजार बंद होताना सराफा बाजारातील या किंमती आहेत.  गुरूवारी सकाळच्या सत्रात सोन्याचे दर 48236 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion & Jewellers Association Ltd) सोन्याचे नवे भाव दिले आहेत. सोन्याने बुधवारी उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याचे भाव लवकरच 50 हजारांचा देखील टप्पा गाठतील अशी शक्यता बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान चांदीचे भाव बाजार बंद  होत असतान 47,585 रुपये प्रति किलो इतके आहेत. चांदीचे दर देखील आज कमी झाले आहेत. बुधवारी चांदीचे दर 48505 रुपये प्रति किलो इतको होते.

(हे वाचा-खूशखबर! SBI मध्ये 445 पदांसाठी नोकरभरती, द्यावी लागणार नाही लेखी परीक्षा)

दरम्यान सोन्याचांदीचे दर कमी झाले असले तरी अद्यापही या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. लॉकडाऊनचा देखील सोन्याच्या किंमतीवर बराच परिणाम झाला आहे. परिणामी जाणकारांच्या मते लग्नसराईच्या काळातही नागरिकांकडून रिसायकल सोन्याचा वापर केला जात आहे.

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

(हे वाचा-सायबर हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर टेलिकॉम कंपन्या सतर्क! या' कर्मचाऱ्यांना अधिक धोका)

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 25, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या