Home /News /money /

सोन्याचांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ सुरूच, इथे वाचा नवे दर

सोन्याचांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ सुरूच, इथे वाचा नवे दर

सोन्याच्या किंमती रेकॉर्ड स्तरावरच आहेत. मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत 53,800 रुपये प्रति तोळा यापेक्षा जास्त आहे.

    नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: सोन्याच्या किंमती रेकॉर्ड स्तरावरच आहेत. मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत 53,800 रुपये प्रति तोळा यापेक्षा जास्त आहे. ही किंमत स्थिर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या सोन्याच्या किमतीत 0.07 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर सकाळी 9.20 वाजता सोन्याचे भाव ऑक्टोबरसाठी 53,823 रुपये प्रति तोळावर ट्रेंड करत होते. त्याचप्रमाणे चांदीची वायदा किंमतही वाढली आहे. MCX वर चांदीच्या सप्टेंबरच्या किंमतीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर चांदीची किंमत 65,889 रुपये प्रतिकिलो झाली आहे. यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी देखील दिल्लीच्या सराफा बाजारात सोनेचांदी महागल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 185 रुपयांनी वाढले होते. तर चांदीचे दर 1,672 रुपये प्रति किलोग्रामने वाढले आहेत. दरम्यात देशात सॉव्हरेन गोल्ड बॉंड योजनेअंतर्गत गोल्ड बॉंड विक्री सोमवारपासून सुरू झाली आहे. वाचा-घरबसल्या या इसमाने एका कंपनीच्या शेअरमधून कमावले 1500 कोटी, वाचा कसे सोमवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 185 रुपयांनी वाढल्यानंतर दर प्रति तोळा 54,678 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढत्या किंमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारात देखील होत आहे. सोमवारी चांदीचे दर 1,672 रुपये प्रति किलोग्रामने वाढल्यामुळे चांदी 66,742 रुपये प्रति किलोग्राम या विक्रमी स्तरावर आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनलिस्ट (कमोडिजिट) तपन पटेल यांच्या मते, रुपयाचे घसरणारे मूल्य सोन्याच्या किंमतीवर परिणाम करत आहे. वाचा-संकटकाळात हे ATM देईल तुमची साथ! मिळेल फ्री इन्श्युरन्स; वाचा सविस्तर यावर्षी 35 टक्क्यांनी महाग झाले सोने यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकर्मनामुळेही स्थिती आणखी बिकट होत आहे. यामुळेच सोन्याचांदीच्या किमती वाढत आहेत
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या