दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर आज अखेर वाढले; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

बुधवारी सराफी बाजारात सोन्याचा दर अखेर वाढला आहे. गेले सलग दोन दिवस सोन्याच्या भावात घसरण होत होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 06:32 PM IST

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर आज अखेर वाढले; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

नवी दिल्ली, 3 जुलैः  बुधवारी सराफी बाजारात सोन्याचा दर अखेर वाढला आहे. सोन्याच्या दराने उसळी घेत 260 रुपयांनी किंमत वाढवली. बुधवारी सोन्याचा दर एका तोळ्यासाठी 34,380 रुपयांपर्यंत पोहोचला होता.  गेले सलग दोन दिवस सोन्याच्या भावात घसरण होत होती. त्यानंतच आज अचानक दहा ग्रॅममागे 260 रुपयांनी दरात वाढ झाली.  सोनं स्वस्त झाल्याने सराफी बाजारात स्थानिक दुकानदारांकडून सोन्याला असलेली मागणी एकदम वाढली. याचा परिणाम आज पाहायला मिळाला. अचानक मागणीत वाढ झाल्याने सोन्याचे भाव वधारले. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या मूल्यवर्धनाची भर पडली.

न्यूयॉर्कमध्ये डॉलरच्या दरानुसार सोन्यात मूल्यवाढ झाली असून त्याचा भाव 1,425.95 प्रति औन्स तर चांदीचा दर 15.31  प्रति औन्स इतका झाला. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसला. याविषयी बोलताना HDFC Securities चे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल म्हणाले, “ट्रेडवॉरचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही पाहायला मिळतो आहे.  बुधवारी सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातला दर प्रत्येक औन्सला 1,430  अमेरिकन डॉलर इतका पोहोचला होता. एक औन्स म्हणजे साधारण 2 ग्रॅम. सोन्याच्या दरात वाढ झाली आणि चांदीचेही दर वधारले. सोन्याचे 10 वर्षांचे बाँड अमेरिकेत गुंतवणूक पर्याय म्हणून वापरले जातात. या गोल्ड बाँड्सच्या किंमतीने दोन वर्षातला नीचांक गाठला. त्याचा परिणाम तिथल्या बाजारावर झाला आणि गोल्ड बाँड्सची मागणी वाढली. म्हणून दरही वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातले दर वाढल्याने त्याचा परिणाम भारतात आज जाणवला आहे."

मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

सोन्याबरोबर चांदीचेही दर वाढले. किलोमागे 150 रुपयांनी वाढ झाली. दिल्लीत चांदीचा दर बुधवारी 38,650 रुपये होता. गेले दोन दिवस परदेशातल्या सोन्याच्या भावात तेजी असली तरी भारतात घसरण पाहायला मिळाली होती. दिल्ली सराफा बाजारात सोन्यामध्ये 20 रुपयांनी घसरून होऊन सोनं 32, 120 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं होतं. चांदीतही बरीच घसरण पाहायला मिळाली होती.

मोदींच्या या 'जबरा फॅन' ने त्यांच्यासाठी केली सायकल यात्रा

Loading...

चांदी 70 रुपयांनी घसरून 38,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. आज मात्र भाव पूर्वपदावर आले.

LIVE VIDEO एका वाघिणीसाठी दोन वाघांची तुंबळ लढाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...