रक्षाबंधनानंतर पुन्हा एकदा सोन्याची उसळी; हा आहे शुक्रवारचा विक्रमी दर

रक्षाबंधनाचं निमित्त साधून अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली. त्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याची मोठी उलाढाल झाली.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 07:06 PM IST

रक्षाबंधनानंतर पुन्हा एकदा सोन्याची उसळी; हा आहे शुक्रवारचा विक्रमी दर

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : रक्षाबंधनानंतर सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर 475 रुपयांनी वाढून 38420 रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. चांदीचा दर 378 रुपयांनी वाढून 44310 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, रक्षाबंधनाचं निमित्त साधून अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली त्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याची मोठी उलाढाल झाली. सोन्या- चांदीच्या दागिन्यांची मागणी अचानक वाढल्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूचे दर वाढले.

BREKAING : जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला High Alert; शत्रू करू शकतो हल्ला

चांदीचे दर वाढण्याचं कारण चांदीची नाणी बनवणाऱ्या कंपन्यांनाही मोठी मागणी आली आणि तेवढी चांदी उपलब्ध नसल्याने भाव वाढले. येत्या काही काळात आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि आपल्याकडे असलेले सणासुदीचे दिवस पाहता सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याचा दर 41000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

का होतंय सोनं महाग?

Loading...

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. अमेरिका-चीनमधलं व्यापार युद्ध पाहता गुंतवणूकदार सारखे सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

हे वाचा - Mission Mangal : सिनेमा पाहण्याआधी वाचा Review आणि Collection Repot

त्यामुळे सोन्याचा दर वाढतो आहे. त्यातच सणासुदीमुळे देशातही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दर चढे आहेत. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढत राहण्याची शक्यता आहे.

2013 नंतर सोनं उच्च स्तरावर

जियोजित फायनॅन्शियल सर्विसेसचे कमोडिटी रिसर्च विभागाचे प्रमुख हरीश म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1500 डाॅलर्स प्रति औंस आहे.

हे वाचा - नोकऱ्यांवर गदा! इंजिनीअर होण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी आधी हे वाचा

2013नंतरचा हा अत्युच्चम स्तर आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

------------------------------------

शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Aug 16, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...