बुधवारचे सोन्याचे दर : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर झाले कमी; चांदीही झाली स्वस्त

बुधवारचे सोन्याचे दर : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर झाले कमी; चांदीही झाली स्वस्त

नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात कपात झाली आहे. आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घ्या...

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात कपात झाली आहे. गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर पडलेले आहेत. भारतातच हा परिणाम उशीरा जाणवला आहे. बुधवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा दर तोळ्यामागे 301 रुपयांनी कमी झाला. चांदीचे दरही कमी झाले आहेत. किलोमागे 906 रुपयांनी चांदी उतरली.

बुधवारी सराफा बाजाराने जारी केलेल्या दराप्रमाणे सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 38,870 रुपये झाला. मंगळवारी हाच भाव 39,171 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारत सोन्याची किंमत 1486 डॉलर एवढी राहिली तर चांदीची किंमत 17.54 डॉलर प्रति औंस एवढी होती.

दिल्लीतला चांदीचा दर पाहिला तर कालच्या तुलनेत तो 906 रुपयांनी कमी झाल्याचं लक्षात येईल. बुधवारी सराफा बाजारात चांदीचा भाव 46,509 रुपये प्रति किलो एवढा झाला. मंगळवारी हाच दर 47,415 रुपयांवर होता.

SBI चा अलर्ट, 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करा हा फॉर्म

मंगळवारी (दिनांक 5 ) नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच सोन्याचे दर कमी झालेले दिसले. दिवाळीत सोन्याचे दर चढले होते. भाऊबीजेच्या दिवशी त्यात किंचित घट झाली होती. मंगळवारी सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 101 रुपयांनी पहिल्यांदाच कमी झाला. चांदीच्या दरातही किरकोळ घट झाली होती. या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर बुधवारी आणखी खाली आले.

मागणी कमी हे आहे कारण

तीन वर्षात पहिल्यांदाच यंदा सोन्याची मागणी कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार जगभरातून सोन्याची मागणी कमी झाली आहे.

Google Pay वरून 2 रुपये भरले आणि पुढच्या क्षणी बसला 40000 चा फटका

भारतातही जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी तब्बल 32 टक्क्यांनी कमी झाली. आर्थिक मंदी आणि स्थानिक बाजारात सोन्याच्या दराचा उच्चांक या कारणांमुळे सोने खरेदी फारशी झाली नाही. मागणी घटली. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत सोन्याची आयात 66 टक्क्यांनी कमी झाली आहे.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

अन्य बातम्या

कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दणका, आता मिळणार नाही 'या' कामासाठी पैसे

कोट्यधीश बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, फक्त एवढच काम करा

करोडपती व्यापाऱ्याचा हरवलेला मुलगा हॉटेलमध्ये भांडी घासताना सापडला; पोलिसांनी उलगडली कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या