नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच स्वस्त झालं सोनं; हे आहेत मंगळवारचे दर

मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. मंगळवारचे दर किती वाचा...

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 07:23 PM IST

नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच स्वस्त झालं सोनं; हे आहेत मंगळवारचे दर

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिवाळीत सोन्याचे दर चढले होते. भाऊबीजेच्या दिवशी त्यात किंचित घट झाली होती. पण त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मंगळवारी सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 101 रुपयांनी पहिल्यांदाच कमी झाला. चांदीच्या दरातही किरकोळ घट झाली आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 39314 रुपये होता. तो 39213 रुपये झाला. चांदीचा भावही किंचित कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 47,735 वरून 47,583 रुपयांवर आला आहे.

तीन वर्षात पहिल्यांदाच यंदा सोन्याची मागणी कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार जगभरातून सोन्याची मागणी कमी झाली आहे.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

Loading...

वाचा - Google Pay वरून 2 रुपये भरले आणि पुढच्या क्षणी बसला 40000 चा फटका

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळते आहे. दिवाळीच्या दिवसात पहिले दोन दिवस स्थानिक बाजारात वाढलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर चढे राहिले. भाऊबीजेच्या दिवशी मात्र दर कमी झाले.

----------------------------

VIDEO : राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि राज्यात कधी लागू झाली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold rate
First Published: Nov 5, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...