भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात झाली घट; असे आहेत सोन्या- चांदीचे मंगळवारचे दर

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात बरीच घट झाली आहे. चांदीचे भावही थोडे कमी झाले आहेत. मंगळवारी सराफा बाजारात काय होते सोन्याचे दर?

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 07:59 PM IST

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात झाली घट; असे आहेत सोन्या- चांदीचे मंगळवारचे दर

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात बरीच घट झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 548 रुपयांनी घटला. सोन्याबरोबर चांदीचाही भाव थोडा कमी झाला आहे. चांदीची किंमत 1190 रुपयांनी घटली. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या भावात चढ-उतार झाल्याने भारतीय बाजारपेठेवरसुद्धा त्याचे परिणाम दिसले. खरं तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनेखरेदी होते. त्यामुळे गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव चढा राहिला होता.

भाऊबीजेच्या दिवशी मात्र सोन्याचा दर 38857 रुपये प्रति तोळा राहिला, तर चांदीच्या दरातही घट झाली. चांदीचा भाव 47,090 रुपये प्रतिकिलो एवढा होता.

धनत्रयोदशी आणि पाडव्याला स्थानिक बाजारपेठेत सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर दरवाढ होऊ शकते. आज ती मागणी कमी झाली असावी. तसंच अहमदाबादचा बाजारही बंद होता. त्याचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या दरात घट झालेली पाहायला मिळाली.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

Loading...

-------------------

गाडीच्या सायलेंसरमागे म्हशींचं मॅरेथॉन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold rate
First Published: Oct 29, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...