दोन दिवस दर उतरल्यानंतर सोन्याच्या किमतीला पुन्हा झळाळी; गुरुवारचे दर

सलग दोन दिवस सराफा बाजारात मंदी दिसली. सोन्याला मागणी कमी म्हणून दर उतरल्याचं सांगितलं गेलं. पण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. जाणून घ्या गुरुवारचे दर...

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 08:54 PM IST

दोन दिवस दर उतरल्यानंतर सोन्याच्या किमतीला पुन्हा झळाळी; गुरुवारचे दर

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर :  सलग दोन दिवस सराफा बाजारात मंदी दिसली. सोन्याला मागणी कमी म्हणून दर उतरल्याचं सांगितलं गेलं. पण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. चांदीचे भावसुद्धा चढले आहेत. राजधानी दिल्लीत सराफा बाजारात गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 38,930 रुपये होता. चांदीचे दरही किलोमागे 230 रुपयांनी वाढले आहेत.

या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, सोन्याची दरवाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारातल्या सोन्याच्या दराच्या चढ-उतारामुळे होते आहे. अमेरिका आणि चीनच्या दरम्यान सुरू असलेलं व्यापार युद्ध आता आणखी महिनाभर तरी लांबण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा या मौल्यवान धातूला आणखी मूल्य प्राप्त झालं. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले.

दिल्लीत सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 38,860 रुपयांवरून गुरुवारी 38,930 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,487 प्रति औंस आणि चांदीचे दर 17.54 डॉलर प्रति औन्स इतके आहेत.

वाचा - एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान

चांदीचा भाव एका किलोमागे 230 रुपयांनी वाढला आणि गुरुवारी तो 46,510 रुपये प्रतिकिलो इतका झाला.

Loading...

नोव्हेंबरमध्ये सलग दोन दिवस सोन्याच्या दरात कपात झाली होती. गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे हे दर पडले होते. भारतातच हा परिणाम उशीरा जाणवला. दिवाळीत सोन्याचे दर चढले होते. भाऊबीजेच्या दिवशी त्यात किंचित घट झाली होती. मंगळवारी सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 101 रुपयांनी पहिल्यांदाच कमी झाला. चांदीच्या दरातही किरकोळ घट झाली होती.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

वाचा - कोट्यधीश बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, फक्त एवढच काम करा

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

---------------------

अन्य बातम्या

BREAKING: देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

फलंदाज होता आऊट पण पंतच्या एका चुकीमुळं NOT OUT, पाहा लाजिरवाणा VIDEO

झुंज संपली! दगडाच्या कपारीत अडकलेल्या वाघाची मृत्यूने केली सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...